મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime: बसमधील गर्दीचा फायदा घेऊन १.०८ लाखांचे दागिने चोरीला

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यात बस प्रवासादरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाशाच्या बॅगेतून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स लांबवल्याची घटना समोर आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

बसमधील गर्दीचा फायदा घेऊन १.०८ लाखांचे दागिने चोरीला
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन १.०८ लाखांचे दागिने चोरीला

Pune Crime : डेक्कन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यात बस प्रवासादरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाशाच्या बॅगेतून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत करमाळा (सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.४२ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला पीएमपीएमएल बसने लॉ कॉलेजकडून नळस्टॉप, एफसी रोड आणि गुडलक चौक (डेक्कन) यादरम्यान प्रवास करत होत्या. त्या वेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादींच्या जवळील बॅग गुपचूप उघडली आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिने असलेली छोटी पर्स चोरून नेली. या पर्समध्ये १ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते.https://maharashtramirror.com/ Pune crime

प्रवास संपल्यानंतर बॅगेतून पर्स गायब असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार शिंदे करत आहेत.अलीकडच्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी सार्वजनिक वाहनांतून विशेषतः बसमधून चोऱ्यांचे प्रमाण येत आहे, या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना नागरिकांनी सतर्क आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात,राहून असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

શેર કરો