Pune Police : खाकीतील देवदूतामुळे चिमुकली सुखरूपणे कुटुंबात परतली
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी :
1 મિનિટ વાંચન

Pune Police : शिक्रापूर येथील पोलिस हवालदार मिलिंद देवरे यांचे होतेय कौतुक
पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी :
Pune Police : ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय ‘ या वाक्याची खऱ्या अर्थाने प्रचिती शिक्रापूर येथे नुकत्याच झालेल्या घटनेतून अनुभवायला आली. गुन्हगारीवर वचक ठेवण्याबरोबरच समाजाचे रक्षण करताना, खाकीतील माणूसकीही पाहायला मिळाली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे एका तीन वर्षीय निष्पाप बालिकेचे मोठे संकट टळले आणि ती सुखरूपपणे पुन्हा कुटुंबात परतली. यामुळे देवेरे यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. (pune ploce shikrapur saves girl)

सदरची घटना शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेला सोबत घेऊन अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्यालगत पडलेली असल्याचे स्थानिक नागरिक विनोद जाधव, राजू दान आणि राधेश्याम आहेर यांच्या निदर्शनास आले. चिमुकली भयभीत अवस्थेत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना माहिती दिली. (Pune Police)
Pune Traffic : डीपी रस्त्यावरील वाहतूक कोंडी
माहिती मिळताच मिलिंद देवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रथम घाबरलेल्या बालिकेला सुरक्षितपणे जवळ घेत तिला धीर दिला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमधून मोबाईल क्रमांक शोधून कुटुंबीयांशी संपर्क साधला. काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व खात्री करून बालिकेला त्यांच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले.
वेळीच केलेल्या या संवेदनशील हस्तक्षेपामुळे एका निष्पाप बालिकेच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता टळली. (Pune Police)

आपल्या मुलीला सुखरूप पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भावना व्यक्त करत, “मिलिंद देवरे हे आमच्यासाठी केवळ पोलीस नाहीत, तर साक्षात पांडुरंग आहेत,” असे सांगत त्यांचे मनापासून आभार मानले. (Pune Police)

या घटनेमुळे खाकी वर्दीमागील माणुसकीचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. कायद्याचे पालन करताना समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची आणि संवेदनांची जपणूक करणारे पोलीसच समाजाचा खरा आधार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. (Pune Police)
Pune Metro : हिंजवडी मेट्रोचा १५ जुलैचाही मुहूर्त हुकणार
पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या या कृतीमुळे शिरूर तालुक्यात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना नागरिकांनी सलाम केला आहे. (Pune Police)
