PUNE NEWS : दुरुस्तीच्या कामामुळे पर्वती परिसरासह मार्केटयार्ड, धनकवडीचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : पर्वती एचएलआर गोल टाकीजवळील १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
1 મિનિટ વાંચન

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: पर्वती एचएलआर गोल टाकीजवळील १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २ जुलै रोजी करण्यात येणार आहे. या कामामुळे पर्वती पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा होणाऱ्या अनेक भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार असून, शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरठा होईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.PUNE NEWS

पर्वती पंपिंग स्टेशनशी जोडलेल्या सिमेंटरी टाकी, विवेकवाडी टाकी, तळजाई टाकी तसेच अपर इंदिरानगर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.PUNE NEWS
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.PUNE NEWS
पाणी पुरवठा बंद राहणारा भाग पुढील प्रमाणे:-
सहकारनगर, पर्वती, वसाहती परिसर, विवेकवाडी, तळजाई, धनकवडीचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, शिवदर्शननगर, अपर व लोअर इंदिरानगर, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डोलेमळा, पर्वती गावठाण, गुलाबनगर, राजरत्न बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, स्टेट बँक नगर, ओम अभिषेक, वासुदेव सोसायटी, दमोदरनगर, विद्यासागर सोसायटी, अरण्येश्वर परिसर, नवमित्र सोसायटी, कोथारी ब्लॉक, वसंतबाग, आईमाता मंदिर परिसर, गंगानगर, गजाननगल्ली, मार्केट यार्ड परिसर आदी भागांचा समावेश आहे.
PUNE NEWS
