Pune News : टिंटेड काचांसह अवैध नंबर प्लेटवर कारवाई
Pune News
2 મિનિટ વાંચન

Pune News : २,२०० हून अधिक वाहनांना दंड; पुणे पोलिस अक्शन मोडवर
Pune News
पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि गुन्हेगारांकडून वाहनांचा गैरवापर रोखता यावा, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी टिंटेड काचा आणि अवैध नंबर प्लेट लावलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. २९ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या तीन दिवसीय कारवाईत २,२०० हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (pune news traffic police penalise 2200 vehicles)
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत नियमबाह्य काळी फिल्म (टिंटेड विंडो फिल्म) लावलेल्या ७०७ चारचाकी वाहनांवर, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा शोभेच्या, बदललेल्या स्वरूपाच्या नंबर प्लेट वापरणाऱ्या १,५०५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. (pune news )
हेही वाचा: Ketan Agarwal Murder: पोलिसांना मूर्ख बनवण्यासाठी पुश, हॅकचा सराव
या मोहिमेदरम्यान केवळ दंडात्मक कारवाईच करण्यात आली नाही, तर वाहनांवरील बेकायदेशीर टिंटेड फिल्म आणि नियमबाह्य नंबर प्लेट घटनास्थळीच काढून टाकण्यात आल्या. शहरात अशा प्रकारच्या वाहनांची संख्या वाढत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी सांगितले की, अनेक वाहनांच्या बाजूच्या काचा आणि मागील विंडशील्डवर परवानगीपेक्षा अधिक गडद फिल्म लावलेली आढळली. तसेच अनेक वाहनांवर बदललेले फॉन्ट, अतिशय लहान किंवा वाचण्यास अडचणीच्या अक्षरांतील नंबर प्लेट, तसेच सजावटीच्या पद्धतीने तयार केलेल्या प्लेट्स वापरल्या जात होत्या.
(pune news ) काही वाहनांच्या नंबर प्लेटवर बैलगाडीचे चित्र, धार्मिक चिन्हे, देवतांची चित्रे आणि इतर सजावटीचे घटक लावण्यात आले होते, जे कायदेशीर नमुन्याशी विसंगत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Pune Metro : मेट्रोच्या अर्धवट कामांमुळे आयटीयन्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित नमुन्यातील उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) वापरण्याचे आणि परवानगीपेक्षा अधिक गडद टिंटेड काचा न लावण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधात विशेष मोहिमा सातत्याने राबविल्या जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला.
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला वाचवण्यासाठी वसंत मोरे सरसावले
हेही वाचा: Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला वाचवण्यासाठी वसंत मोरे 'सरसावले'!
