મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : हांडेवाडी रस्त्यावरील पर्जन्यजल निचरा कामामुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : हांडेवाडी रस्त्यावरील पर्जन्यजल निचरा कामामुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

पुणे, महाराष्ट्र मिरर,PUNE NEWS : पुणे महानगरपालिकेकडून हांडेवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या पर्जन्यजल निचरा आणि चेंबर बांधकामाच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरात रस्त्याची खोदाई, खड्डे आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.PUNE NEWS

हांडेवाडी, महंमदवाडी, सय्यदनगर, ससाणेनगर आणि सोलापूर महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, बस आणि व्यावसायिक वाहनांची वर्दळ असते. विशेषतः सायंकाळी ४ ते ७ या वेळेत वाहतूक कोंडी तीव्र होत असून अनेकदा वाहतूक ठप्प होते.
रस्त्यावर मोठे खड्डे, असमान पृष्ठभाग आणि सुरू असलेले खोदकाम यामुळे वाहनचालकांना सुरक्षितपणे मार्ग काढणे कठीण झाले आहे. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.PUNE NEWS

स्थानिक रहिवासी नीलम मानकर यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तर हुसेन सय्यद यांनी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रभावी वाहतूक नियोजन आणि वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्याची गरज व्यक्त केली आहे.PUNE NEWS

स्थानिक नागरिकांनी महापालिकेने कामाचा वेग वाढवून रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करावा, तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

PUNE NEWS

શેર કરો