PUNE NEWS : लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी
2 મિનિટ વાંચન

पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची मागणी
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय असला तरी प्रत्यक्षात खुद्द लोक कलावंत अद्यापही उपेक्षितांचे जगणे जगत असून त्यांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी केली.PUNE NEWS

लोककलावंतांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचाव्या, लोककलावंतांमध्ये विचारांचे आदान प्रदान व्हावे व विविध लोककलांचा रसिकांना परिचय व्हावा, या दृष्टीने राज्याचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने या वर्षापासून समरसता लोककला संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी नर्तिका मधू कांबीकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी स्वीकारला.PUNE NEWS
याप्रसंगी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आलेगांवकर, लोककलावंत नंदेश उमप, पद्मश्री वितहाबाई नारायनगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, छाया आणि माया खुतेगावकर, राधा खुडे, बिग बॉस फेम अहिराणी गायक सचिन कुमावत, नृत्यांगना वैशाली जाधव, रेशमा मुसळे, अनिल मोरे, सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या जान्हवी जानकर, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ गराडकर, भाजप शहराध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष धीरज घाटे, संमेलनाचे आयोजक धनंजय खुडे, निलेश गद्रे, डॉ प्रसन्न पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
समाजात एकोपा वाढावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, म्हणजेच सामाजिक समरसता! लोक कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून शतकानुशतके प्रबोधनाचे, सांस्कृतिक आदान प्रदानाचे आणि सलोखा निर्माण करण्याचे कार्य परंपरेने करीत आहेत. मात्र, लोक कलावंतांचे स्वतःचे जगणे अजूनही आव्हानात्मक स्वरूपाचे आहे, याकडे खेडेकर यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.
शासनाच्या लोककलावंतांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोक कलावंत निश्चितपणे पुढे येतील. मात्र, लोककलावंतांकडे आजही गावकुसाबाहेर असल्याप्रमाणे बघितले जात आहे. आपली कला सादर करण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या कलावंतांना प्रस्थापितांकडून अन्याय सहन करावा लागतो. स्थानिक पोलिस आणि प्रशासन देखील कलावंतांच्या तक्रारींची दखल न घेता प्रस्थापितांची पाठराखण करतात. हे सर्व आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कानावर घालायचे होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीने आमची निराशा झाली, असे परखड मतही खेडेकर यांनी व्यक्त केले.PUNE NEWS
यावेळी जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, कार्यक्रमाचे संयोजक आणि आघाडीचे लोक कलावंत धनंजय खुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
PUNE NEWS
