મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS: वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर बदनाम: सुप्रिया सुळे

वाढती गुन्हेगारी पोलीस यंत्रणेला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला उपस्थित

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS: वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर बदनाम: सुप्रिया सुळे
Image ref 152082021. Copyright Shutterstock No reproduction without permission. See www.shutterstock.com/license for more information.

वाढती गुन्हेगारी पोलीस यंत्रणेला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला उपस्थित

निलेश राऊत
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दररोज गुन्हेगारीची एकतरी घटना घडतच आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे बदनाम झाले आहे. गुन्हेगारीबाबत राज्य सरकार, केंद्र सरकार व पुणे पोलिसांच्या डेटामध्ये तफावत असून, कुठला डेटा खरा मानायचा? पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलीस यंत्रणेला दिसत नाही का, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Image ref 152082021. Copyright Shutterstock No reproduction without permission. See www.shutterstock.com/license for more information.

पुण्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा मुद्दा केवळ राजकारणाचा नसून पुणेकर म्हणून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आपल्या घरातील मुलं-मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.PUNE NEWS

पोलिसांना पूर्ण सहकार्य
वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावर पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. पोलिसांनी बैठकांना बोलवावे. दरम्यान, सामाजिक प्रश्नात राजकारण बाजू ठेवून पिढीच्या हितासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आमची तयारी असून, पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या.PUNE NEWS

लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडणुकांच्या आधी २ कोटी ६५ लाख महिलांना पैसे पाठवले. शासकीय नोकरी असताना अनेकांनी योजनेला लाभ घेतला. पुरुषांनाही पैसे मिळाले. त्यानंतर पडताळणी करून काही महिलांना योजनेतून वगळले. खरंतर योग्य निकष लावून त्याची अंमलबजावणी न झाल्याने या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जनधन योजना आणि आधार कार्ड एकत्र करून लाडकी बहीण योजना का नाही राबविली, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.

PUNE NEWS

શેર કરો