મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

रखडलेली कामे प्रशासनामार्फत तातडीने पूर्ण करण्याची मागणी

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

रखडलेली कामे प्रशासनामार्फत तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पुणे, निलेश राऊत : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुका-२०२६ अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीचा निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.PUNE NEWS

रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी आता प्रशासनामार्फत रखडलेली सर्व कामे व धोरणात्मक निर्णय यद्धपातळीवर घ्यावेत. तसेच पालखी सोहळा पुण्यात येत असल्याने त्या अनुषंगाने पाऊस सुरू होण्यापूर्वी नालेसफाईसह सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे.PUNE NEWS

PUNE NEWS

શેર કરો