મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : ओबीसीप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : ओबीसीप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे PUNE NEWS: मराठा समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, फी सवलती आणि विविध शैक्षणिक योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.PUNE NEWS

या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार असून, शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ होणार आहेत. विशेष म्हणजे, सरकारने या निर्णयात एक महत्त्वाची तरतूद केली आहे. भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी कोणतीही नवीन शैक्षणिक सवलत किंवा योजना लागू झाल्यास त्याचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही आपोआप मिळणार आहे. त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय किंवा आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही.PUNE NEWS

सरकारच्या या निर्णयाचे मराठा समाजातील विद्यार्थी आणि पालकांकडून स्वागत करण्यात येत असून, शैक्षणिक क्षेत्रात याचे दूरगामी परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शैक्षणिक सवलतींच्या बाबतीत मराठा विद्यार्थ्यांना अधिक स्थैर्य आणि निश्चितता मिळणार असून, शिक्षण क्षेत्रात त्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

PUNE NEWS

શેર કરો