મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पुणे PUNE NEWS: सासवड शहरालगतच्या वाघडोंगर परिसरात सोमवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच सकाळ-सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाघडोंगर परिसर हा सासवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. दररोज अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी येथे फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र सोमवारी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.PUNE NEWS

परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी महिला आणि लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सासवड येथील नागरिक रोहिदास घारे म्हणाले, "आम्ही रोज सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी वाघडोंगर परिसरात येत असतो. येथे प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात."PUNE NEWS

नागरिकांसाठी सूचना
दरम्यान, वाघडोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा अधिवास या भागात नैसर्गिकरीत्या असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे वन्यजीवांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, एकटे फिरणे टाळावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

PUNE NEWS

શેર કરો