PUNE NEWS : श्रीक्षेत्र वीर येथे सोमवती अमावास्येनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी
देवस्थान ट्रस्टचे डिसाळ नियोजन; भरगर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; अनेक भक्तांचे मोबाईल-पैसे लंपास
2 મિનિટ વાંચન

देवस्थान ट्रस्टचे डिसाळ नियोजन; भरगर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; अनेक भक्तांचे मोबाईल-पैसे लंपास
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी सोमवती अमावास्येनिमित्त भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.PUNE NEWS

पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १०वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या.
देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. सकाळी ११.३० वाजता धुपारती होऊन श्रीनाथांची पालखी छत्री, अब्दागिरी, ढोल व चवरीसोबत सर्व दागीनदार सालकरी, भाविक-भक्त, ग्रामस्थ यांच्या लवाजम्यासहीत श्रीक्षेत्र घोडेउड्डाण येथे नीरा स्नानासाठी गेले होते.PUNE NEWS
पालखी मार्गावर देवस्थानमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी व रस्त्यावर पाणी मारून उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी पाणी टॅंकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
दुपारी विधिवत नीरास्नान होऊन श्रीनाथांची पालखी नेहमीप्रमाणे सायंकाळी देऊळवाड्यात विराजमान झाली. महाप्रसादाचे आयोजन प्रभाकर मोरे, तात्या बुरुंगले, राऊत, वाघमोडे, सुनील धुमाळ, संकेत जगताप यांचेमार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, स्वयंसेवक इ.चे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले.यावेळी काही मोजकेच विश्वस्त व सल्लागार मंदिरात उपस्थित होते.PUNE NEWS
देवस्थान ट्रस्टच्या ढिसाळ नियोजनाचा भाविकांना मनस्ताप
सलग दोन अमावास्या असल्यामुळे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या अनुषंगाने मंदिरामध्ये नियोजनाचा अभाव आढळून आला. उष्णतेची दाहकता लक्षात घेऊन संपूर्ण मंदिर परिसरात नेट बांधून चटया अंथरणे गरजेचे होते. आदल्या दिवशी मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांना एकाच रांगेतून प्रवेश देणे गरजेचे होते. तर ज्या भाविकांना तात्काळ दर्शन घ्यायचे आहे त्यांना मुख्य गाभाऱ्याच्या अलीकडेच देवाच्या पादुकांच्या पाटापाशी दर्शन देण्याचे ठरले होते; परंतु असे झाले नाही. अनेकदा महिलांच्या लाईनमधून पुरुषही दर्शनासाठी पुढे जात होते. त्यामुळे ड्युटीवर असणाऱ्या होमगार्डनीही हात टेकले होते.PUNE NEWS
देवस्थान ट्रस्टने अमावास्येच्या दिवशी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाची मदत घेणे गरजेचे होते. तसेच जादाचे स्वयंसेवक किंवा होमगार्ड मागवणे गरजेचे होते. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापून पैसे व मोबाईल चोरून नेले आहेत. यातील काही अल्पवयीन चोरटे पकडण्यात आल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.PUNE NEWS
देवस्थान ट्रस्टचे कारभारी सकाळी घरी, दुपारी शेतावरी अन संध्याकाळी सगळ्यांना दम भरी…
देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त व सल्लागार असे सर्व मिळून अकरा जण असताना काही मोजकेच विश्वस्त मंदिरात उपस्थित असतात. फक्त मानपान आणि आणि चमकोगिरी करण्यासाठी ही पदे नसतात,याचेही विश्वस्तांनी भान ठेवणे गरजेचे आहे. महिन्यातील एका अमावास्येसाठी हे विश्वस्त मंडळ व सल्लागार मंडळ देवासाठी वेळ देत नसतील तर त्यांना त्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. वेळीच विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, पुजारी मंडळ व मानकरी यांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आपले कर्तव्य करणे गरजेचे आहे.
PUNE NEWS
