મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यास अपयश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची कबुली

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : पुण्यातील कचरा समस्या सोडवण्यास अपयश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची कबुली

पुणे, महाराष्ट्र मिरर PUNE NEWS : शहरातील वाढती कचरा समस्या आजही कायम असून, योग्य धोरणाच्या अभावामुळे ती प्रभावीपणे सोडवण्यात प्रशासनाला अपयश आल्याची स्पष्ट कबुली राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.PUNE NEWS

कोथरूड येथे जैवविघटनशील कचऱ्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणाऱ्या अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आणि पर्यावरण प्रयोगशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यसभा खासदार खासदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.PUNE NEWS

“धोरण ठरविण्याची जबाबदारी आपलीच असताना आजपर्यंत कचरा प्रश्न मार्गी लावता आला नाही, हे आपले अपयश आहे,” असे मंत्री मिसाळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी त्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज अधोरेखित केली. अशा पद्धतीने प्रत्येक भागात कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया केल्यास वाहतूक खर्च कमी होईल आणि शहराची कचरा समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.PUNE NEWS

यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारकडून कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, चांगले नियम बनवूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महापालिकेने योग्य नियोजन करून प्रस्ताव सादर केल्यास शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक निधी मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प शास्त्रोक्त पद्धतीने आणि पर्यावरणपूरक रीतीने चालविले जात असल्याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

PUNE NEWS

શેર કરો