PUNE NEWS : सेट परीक्षा ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवली
१६ जून पर्यंत असलेली मुदत वाढवून २६ जून पर्यंत करण्यात आली आहे
1 મિનિટ વાંચન

१६ जून पर्यंत असलेली मुदत वाढवून २६ जून पर्यंत करण्यात आली आहे
पुणे PUNE NEWS: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक २६ जुलै २०२६ रोजी ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक २ जून २०२६ ते १६ जून २०२६ अशी देण्यात आली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील पंधरा दिवसांत सेट परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे या कालावधीत शक्य झाले नसल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.PUNE NEWS

त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत विना विलंब शुल्क दिनांक १७ जून २०२६ ते दिनांक २६ जून २०२६ अशी वाढविण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह मुदत दिनांक २७ जून २०२६ ते ३० जून २०२६ अशी वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली असल्यास ती दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी दिनांक १ जुलै २०२६ ते ३ जुलै २०२६ असा ठेवण्यात आला आहे, असे कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट) यांनी कळवले आहे.
PUNE NEWS
