મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : नवले ब्रिजजवळ सिमेंट मिक्सर उलटला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे झाला अपघात

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : नवले ब्रिजजवळ सिमेंट मिक्सर उलटला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे झाला अपघात

पुणे PUNE NEWS: शहरातील नवले ब्रिज परिसरात बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर वळण घेताना पलटी झाल्याने त्याखाली दुचाकी दबली जाऊन ३१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार (१० जून) मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिजजवळील पल्स हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला. गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०, रा. लोणी काळभोर) हे अशोक लेलंड कंपनीचा सिमेंट मिक्सर (एमएच १२ आरएन २८६६) घेऊन कात्रजकडून बावधनच्या दिशेने जात होते. नवले चौकातील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सिमेंट मिक्सर पलटी झाला.PUNE NEWS

यावेळी डाव्या बाजूने बावधनकडे जाणारी होंडा शाईन दुचाकी (एमएच २३ बीएल ५२२५) सिमेंट मिक्सरखाली दबली गेली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१, सध्या रा. कात्रज; मूळ रा. ता. हाजीपूर, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख रनसुरे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.PUNE NEWS

मृत रामेश्वर भोगले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी दिली.PUNE NEWS

नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

PUNE NEWS

શેર કરો