PUNE NEWS : ‘बालगंधर्व’ चा तीन दिवसीय वर्धापनदिन साजरा होणार
२४ ते २६ जूनदरम्यान आयोजन
1 મિનિટ વાંચન

२४ ते २६ जूनदरम्यान आयोजन
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: बालगंधर्व रंगमंदिराचा ५८ वा वर्धापन दिन महोत्सव २४ ते २६ जून दरम्यान साजरा होणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.PUNE NEWS

ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या संचालिका दीपाली कांबळे, पराग चौधरी, चित्रसेन भवार, मंदार जोशी, अरुण गायकवाड, शशिकांत कोठावळे आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.PUNE NEWS
ऑर्केस्ट्रा क्षेत्रात तब्बल ६५ वर्षे उल्लेखनीय योगदान देणारे मेलडी मेकर्सचे निर्माते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अशोकककुमार सराफ यांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जीवनगौरव पुरस्कार करण्यात येणार आहे. तसेच, तमाशा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आला असे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड आणि विजय जगताप यांना बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.PUNE NEWS
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा होणार सन्मान
या तीन दिवसीय महोत्सवात राज्यभरातील विविध कलाक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०२ कलाकारांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. लावणी, लोकधारा, जादूचे प्रयोग, ऑर्केस्ट्रा, तमाशा तसेच इतर विविध लोककला आणि सांस्कृतिक कलाप्रकारांतील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
PUNE NEWS
