મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : लोककला टिकण्यासाठी कलावंतांना राजाश्रयाची गरज

समरसता लोककला संमेलनामध्ये लोककलावंतांची मागणी

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : लोककला टिकण्यासाठी कलावंतांना राजाश्रयाची गरज

समरसता लोककला संमेलनामध्ये लोककलावंतांची मागणी

निलेश राऊत
पुणे, PUNE NEWS
: महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून लावणी, तमाशा, गवळण ,भारुड ,पोवाडा आदी विविध प्रकारच्या लोककला सादर होत आहेत. या लोककलांनी महाराष्ट्राचे जगणे आणि संस्कृती समृद्ध केले आहे. त्यांमुळे महाराष्ट्राची ओळख आणि वैभव निर्माण झाले आहे परंतु या कला सादर करणारे लोककलावंत मात्र अद्याप अनेक समस्यांना तोंड देत आहेत. लोककलावंत टिकले तरच खऱ्या अर्थाने लोककला टिकेल लोककलावंतांना आधार देण्यासाठी लोकांच्या पाठिंबाबरोबरच सरकारने आधार देऊन त्यांना राजश्रय देण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ लोककलावंतांनी केले.PUNE NEWS

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषदेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनामध्ये जेष्ठ लोककलावंतांनी आपली भावना व्यक्त केली. ज्येष्ठ नृत्यांगना मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ गायक नंदेश उमप, जयमाला इनामदार, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रचे प्रमुख प्रवीण भोळे आदी चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. प्रसन्न पाटील, धनंजय खुडे, निलेश गद्रे आदी यावेळी उपस्थित होते.PUNE NEWS

लोककलावंतांना आधार देण्याची गरज
रघुवीर खेडकर म्हणाले, "अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये पन्नास वर्षांपूर्वी आम्ही लोककला जपली आणि ती समृद्ध केली. पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाशाचे शंभर फड होते परंतु आता केवळ दहा ते बारा फड शिल्लक राहिले आहेत. लोककला या लोककलावंतांमुळे टिकली आहे परंतु लोककलावंत जर आर्थिक अडचणीत असेल तर तो त्याची कला किती वर्ष सादर करू शकतो. त्यामुळे लोककला टिकण्यासाठी सरकारने लोककलावंतांना आधार देण्याची गरज आहे."PUNE NEWS

मंगला बनसोडे म्हणाल्या, "लोकांनी माझ्या कलेला कायम दाद दिली. त्यांच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकले. प्रेक्षकांनी मला जर प्रेम दिले नसते तर मी हा प्रवास करू शकले नसते. त्यामुळे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहणार आहे."

लोककलावंतांचा अपमान
सुरेखा पुणेकर म्हणाल्या, "लोककलावंतांच्या समस्या सरकार पुढे मांडण्याची गरज आहे. परंतु सरकारच्या या संमेलनामध्येच स्वतः सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत. हा एक प्रकारे लोककलावंतांचा अपमान आहे. लोककलावंतांच्या समस्या सरकारने ऐकून घेतल्या नाहीत तर त्या कशा सुटतील. गेल्या अनेक वर्षांपासून लोककलावंत समस्यांशी संघर्ष करत आहेत. या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी लोक कलावंतांनी एकत्र येण्याची गरज आहे."PUNE NEWS

नंदेश उमप म्हणाले, "लोककलावंतांनी आपली एकजूट दाखवून दिली पाहिजे."

PUNE NEWS

શેર કરો