મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE NEWS : धावपटूच्या मृत्यू प्रकरणी कारवाई न केल्यास 'आप'चा आंदोलनाचा इशारा

वाडिया काॅलेज मॅरेथॉनमधील निष्पाप धावपटूच्या मृत्यूस जबाबदार आयोजकांवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करा: आप नेते रविराज काळे

PG
Prashik Ghaste

2 મિનિટ વાંચન

PUNE NEWS : धावपटूच्या मृत्यू प्रकरणी कारवाई न केल्यास 'आप'चा आंदोलनाचा इशारा

वाडिया काॅलेज मॅरेथॉनमधील निष्पाप धावपटूच्या मृत्यूस जबाबदार आयोजकांवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करा: आप नेते रविराज काळे

​पुणे, प्रतीक्षा पारखी, PUNE NEWS: १७ मे २०२६ रोजी वाडिया काॅलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या 'रन्स अँड माइल्स हाफ मॅरेथॉन पर्व १' या स्पर्धेदरम्यान आयोजकांच्या ढिसाळ आणि बेजबाबदार नियोजनामुळे संदीप लक्ष्मण यादव या तरुण धावपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेला पूर्णपणे मॅरेथॉनचे आयोजक रजत कसबे हेच जबाबदार असून, त्यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.PUNE NEWS

​या संदर्भात सविस्तर माहिती देताना रविराज काळे यांनी सांगितले की, "१७ मे २०२६ रोजी वाडिया कॉलेज येथून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा चार गटांत शेकडो धावपटू सहभागी झाले होते. १० किलोमीटरच्या गटामध्ये संदीप लक्ष्मण यादव हा तरुण धावत होता. मात्र, वाडिया कॉलेज ते आगाखान ब्रिज दरम्यान धावत असताना अचानक त्याची तब्येत खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला."PUNE NEWS

​वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही
"जर मॅरेथॉन आयोजकांकडून संदीप यादव याला वेळेवर प्रथमोपचार किंवा कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) उपलब्ध झाली असती, तर आज या तरुणाचे प्राण वाचले असते. आयोजकांच्या नियोजनात वैद्यकीय आयोजनासंदर्भात प्रचंड मोठा अभाव आणि निष्काळजीपणा दिसून आला आहे," असे काळे म्हणाले.PUNE NEWS

​परवानगीचे नियम धाब्यावर
ते म्हणाले, "आयोजक रजत कसबे यांनी वाहतूक शाखा, पुणे पोलीस यांची परवानगी घेतली नाही. स्थानिक कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनची आवश्यक ती कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. हा थेट नियमांचा भंग आहे."PUNE NEWS

पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी
सदर मॅरेथॉनच्या मार्गावर बंदोबस्तासाठी आणि सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या ५ पोलीस अंमलदारांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होत असून, त्यांच्यावरही तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात अली आहे.

​पुढील पाऊल
"एका निष्पाप तरुणाचा जीव आयोजकांच्या चुकीच्या आणि व्यापारी वृत्तीच्या नियोजनामुळे गेला आहे. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य आयोजक रजत कसबे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा, अन्यथा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायदेशीर आणि तीव्र संघर्ष उभारू," असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.PUNE NEWS

PUNE NEWS

શેર કરો