મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : भरधाव कारची मोपेडला जोरदार धडक; अपघातात महिलेचा मृत्यू

Pune News : मुंढवा ब्रिजजवळील खराडकर पार्क चौकातील दुर्घटना

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

भरधाव कारची मोपेडला जोरदार धडक
अपघातात महिलेचा मृत्यू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने कार चालविणाऱ्या चालकाने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास खराडी येथील मुंढवा ब्रिजच्या सुरुवातीला, खराडकर पार्कजवळील रिव्हरडेल रोड चौकात घडली. या अपघातात रोहिणी भगवान भालेराव (वय ५०, रा. येरवडा, पुणे) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती भगवान भालेराव (वय ६०, रा. येरवडा) यांनी याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता धोंडिबा सूर्यवंशी (वय २५, रा. वाघोली, पुणे) हा त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविताना त्याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी प्रवास करत असलेल्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहिणी भालेराव गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम ११९, १७७, १८४ आणि १८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक दत्ता सूर्यवंशी याला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावण आवारे करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper