મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

पुणे मनपाचा जागतिक मंचावर डंका

१३ व्या 'वर्ल्ड अर्बन फोरम’मध्ये पुण्याच्या बालस्नेही विकासकामांचे सादरीकरण

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

पुणे मनपाचा जागतिक मंचावर डंका

१३ व्या 'वर्ल्ड अर्बन फोरम’मध्ये पुण्याच्या बालस्नेही विकासकामांचे सादरीकरण

पुणे: बालके आणि पालकांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि दर्जेदार सार्वजनिक जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल आता जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ , युनिसेफ आणि युन-हॅबिटॅट यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या ‘वर्ल्ड अर्बन फोरम’ १३ मधील ‘स्पेस’ या विशेष सत्रात पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला.

एकात्मिक नियोजनाचे आंतरराष्ट्रीय सादरीकरण
या जागतिक व्यासपीठावर पुणे मनपाचे मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे यांनी पुणे शहराने अंगीकारलेल्या बालस्नेही धोरणाचे सादरीकरण केले. रस्ते, सार्वजनिक उद्याने, शाळा, रुग्णालये आणि इतर नागरी पायाभूत सुविधांमध्ये बालकांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पुणे मनपा कशा प्रकारे एकात्मिक नियोजन करत आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

मनपाची दीर्घकालीन वचनबद्धता, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पद्धती आणि सार्वजनिक जागांचा विस्तार करण्याची धोरणे त्यांनी अतिशय प्रभावीपणे जगासमोर मांडली. या सत्रात सह-अभियंता वर्षाराणी खेमनार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

पुणे न्यूज

શેર કરો