Pune Crime : महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १३.७२ लाखांची फसवणूक
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५ जणांची तब्बल १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune Crime :दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५ जणांची तब्बल १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मे २०२५ पासून १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये सचिन बबन भालेराव (वय ४३ वर्षे, रा. थेरगाव गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे), संतोष वाल्हेकर (वय ४० वर्षे, रा. नायडू हॉस्पिटल, पुणे शहर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
सफाई कामगार म्हणून महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या इतर ४ सहकाऱ्यांना जाळ्यात ओढले. कागदपत्रांची प्रक्रिया आणि प्रशासकीय फी भरण्याच्या बहाण्याने आरोपींनी एकूण ५ जणांकडून वेळोवेळी १३,७२,०००/- रुपये रोख स्वरूपात स्वीकारले.
रक्कम उकळल्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारची नोकरी उपलब्ध करून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे आणि विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
नागरिकांना आवाहन
सरकारी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
