મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Pune News :पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय वळण लागून वातावरण चांगलेच तापले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Pune News :एस.एम. जोशी पुलाजवळ कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केले

Pune News :पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय वळण लागून वातावरण चांगलेच तापले आहे. नवी पेठ येथील एस.एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नवी पेठ येथील एस.एम. जोशी पुलाजवळ व पत्रकार भवनाशेजारी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यादरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी जमलेल्या मोठ्या गर्दीच्या वर हवेत एक ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना दिसून आला.https://maharashtramirror.com/ Pune News

सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार युवराज भारत टेळे यांनी तात्काळ ड्रोन चालकाचा शोध सुरू केला. आंदोलनाच्या मागील बाजूस असलेल्या जनरेटरजवळ एक व्यक्ती रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने ड्रोन नियंत्रित करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

तपासात अनधिकृत चित्रीकरणाचा पर्दाफाश
पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ड्रोन चालवणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले व त्याची सखोल विचारपूस केली. दिगंबर भारत खारे (वय ३५, रा. आंबेगाव) असे या फोटोग्राफरचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडे ड्रोन उडवण्याबाबत आणि चित्रीकरण करण्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे सक्षम प्रशासकीय अथवा पोलीस विभागाची कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

कोणाच्या सांगण्यावरून सुरू होते चित्रीकरण?
पोलीस चौकशीदरम्यान संशयित आरोपी दिगंबर खारे याने खळबळजनक खुलासा केला. सदर ड्रोन आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रमोद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्या प्रत्यक्ष सांगण्यावरून आपण हे चित्रीकरण करत असल्याचे पोलिसांना सांगितले. अत्यंत गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे व नियमबाह्य असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला.

५० हजारांचा मुद्देमाल सीलबंद
कारवाईदरम्यान पोलिसांनी पंचांसमोर सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन सीलबंद केला. यामध्ये राखाडी रंगाचा 'डीजीआय' कंपनीचा जुना ड्रोन (अंदाजे किंमत ४०,००० रुपये), : काळ्या रंगाचा 'डीजीआय' कंपनीचा ड्रोन रिमोट कंट्रोलर (अंदाजे किंमत १०,००० रुपये) या साहित्याचा समावेश आहे.

वारंवार सूचना देऊनही आणि विचारणा करूनही ड्रोन उडवण्याचा कोणताही कायदेशीर परवाना किंवा वैध कागदपत्रे सादर न करू शकल्यामुळे, पोलीस हवालदार युवराज टेळे यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचा अवमान) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शोभा तेली करत आहेत.

आंदोलनाच्या ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवल्याच्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन आता आंदोलनस्थळावरील सुरक्षेबाबत अधिक कडक पावले उचलत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો