મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : कॅम्पातील MG रोडवर पार्किंगच्या नावाखाली लूट

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

1 મિનિટ વાંચન

Pune News

Pune News : बनावट पावत्या आणि वसुलीचा पर्दाफाश

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune News : शहरातील रहदारीचे ठिकाण असलेल्या मॉल्स, बाजारपेठ आणि चित्रपटगृहाजवळ असलेल्या पार्किंग झंोनमध्ये अनियमिततता असून त्यापायी अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची सर्रास लूट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ज्या खाजगी संस्थांना महापालिकेतर्फे पार्किंगचे कंत्राट देण्यात आले आहे त्याठिकाणी अवाजवी पैसे आकारले जात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, शहरातील कॅन्टोन्मेंटमध्ये येणाऱ्या कॅम्प परिसरातूनही नागरिकांची तक्रार याप्रकरणी समोर आली आहे. pune mg road parking scam extortion

पुणे कॅम्पातील अत्यंत वर्दळीच्या महात्मा गांधी (एमजी रोड) रस्त्यावर पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची उघडपणे लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पार्किंगचे अधिकृत कर्मचारी मशीनवर छापलेले अधिकृत दर पेनने खोडून नागरिकांकडून १० ते २० रुपये जादाची किंमत बेकायदेशीरपणे वसूल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. Pune News

SPPU : बीए-बीकॉमचे निकाल तीन महिन्यांपासून रखडले; विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे कर्मचारी डिजिटल पेमेंट्स (युपीआय) स्वीकारण्यास स्पष्ट नकार देतात आणि सुटे पैसेही परत करत नाहीत.

पावत्यांमध्ये फेरफार
मशीनवर छापलेले अधिकृत दर पेनने खोडून नागरिकांकडून जास्त पैसे उकळले जात आहेत. युपीआय (UPI) किंवा इतर डिजिटल माध्यमातून होणारे व्यवहार नाकारून केवळ रोख पैशांचाच आग्रह धरला जात आहे. परिसरात अधिकृत दर दर्शवणारे मोठे फलक नसल्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे. असा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. Pune News

CNG News : एमएनजीएलच्या कमी गॅस दाबाचा वितरकांना फटका

अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप त्रस्त वाहनचालकांनी केला आहे. सामान्य करदात्यांची होणारी ही पिळवणूक त्वरित थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો