મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Metro 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा सिग्नल; माण ते बालेवाडी मार्गावर प्रवासी सेवा लवकरच

Pune Metro 3 : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची १३ किमी मार्गासाठी तात्पुरती मंजुरी

પક
પ્રતિક્ષા કાટે

2 મિનિટ વાંચન

metro

Pune Metro 3 : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची १३ किमी मार्गासाठी तात्पुरती मंजुरी; १२ स्थानकांचा समावेश, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेवा सुरू होणार

Pune Metro 3 : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला मोठा दिलासा मिळाला आहे. माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) तात्पुरती मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ५ ते ८ जुलैदरम्यान या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर मार्गातील आवश्यक त्रुटींची पूर्तता, विविध तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर सिग्नलिंग व्यवस्था, ट्रॅक, रोलिंग स्टॉक, दूरसंचार प्रणाली, अग्निसुरक्षा आणि विद्युत यंत्रणांशी संबंधित प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली.Pune Metro 3

CET Cell : विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा; कॅप प्रवेशात पसंतीक्रम भरतानाच दिसणार मागील वर्षाचे कट-ऑफ

सर्व सुरक्षा आणि तांत्रिक निकष पूर्ण झाल्यानंतर सीएमआरएसकडून ही मंजुरी देण्यात आली आहे. या टप्प्यात माणपासून बालेवाडीपर्यंतच्या १२ स्थानकांचा समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची यशस्वी चाचणी पूर्ण झाल्याने मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे मेट्रो ताशी ८० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम असेल. तसेच हा मार्ग ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणालीवर आधारित असणार आहे.Pune Metro 3

SPPU : बीए-बीकॉमचे निकाल तीन महिन्यांपासून रखडले; विद्यार्थी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता हा मेट्रो मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना या मार्गामुळे जलद आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.Pune Metro 3

education : दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा; जंतरमंतर आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाईचा सामना करावा लागणार

‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी ही मंजुरी प्रकल्पासाठी ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनीही हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असे स्पष्ट केले.Pune Metro 3

सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर आता काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माण ते बालेवाडी या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता मेट्रोच्या उद्घाटन आणि प्रत्यक्ष सेवेकडे लागले आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો