મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’चे लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे दिमाखात उद्घाटन झाले.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन
पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

Pune News : १२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; गरबा, दांडिया, लावणी, संगीत, नृत्य आणि रावणदहनाचा थरार

Pune News :पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’चे लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शौर्य ढोल-ताशा पथकाच्या वादनाने उद्घाटन सोहळ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेhttps://maharashtramirror.com/ Pune News

यंदा या महोत्सवाचे २९ वे वर्ष असून, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, निमंत्रक शुभांगी सातपुते आणि उत्सव अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होत आहे. महोत्सवांतर्गत १२ ऑक्टोबर रोजी ‘साई दरबार’, १३ ऑक्टोबर रोजी ‘पाहणं तुम्ही म्हणाल तसं’ हा लावणी कार्यक्रम, १४ ऑक्टोबर रोजी ‘गीतों का सफर’, तर १५ ऑक्टोबर रोजी लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો