મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : धरण क्षेत्रातील अतिक्रमणांवरून पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

Pune News :पुणेकरांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे कटिबद्ध असून खडकवासला व पवना धरणक्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

3 મિનિટ વાંચન

धरण क्षेत्रातील अतिक्रमणांवरून पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
धरण क्षेत्रातील अतिक्रमणांवरून पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

Pune News :धरणक्षेत्रातील अतिक्रमणांना विरोध करणारे नेते कोणाचे? राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे: गणेश बिडकर

Pune News :पुणे, धनश्री ओतारी

Pune News :पुणेकरांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे कटिबद्ध असून खडकवासला व पवना धरणक्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या कारवाईला विरोध करणारे आणि पालिकेत आंदोलन करणारे विरोधी पक्षांचे नेते नेमके कुणाचे हित जपत आहेत, याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असा घणाघाती टोला पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश बिडकर यांनी लगावला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

धरणक्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणांच्या गंभीर मुद्द्यावरून बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

धरणक्षेत्रातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर
पुणे शहराला आणि लगतच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला व पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या भागात तब्बल ५०० हून अधिक आलिशान बंगले, मोकळे लॉन्स आणि रिसॉर्ट्स उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या बेकायदेशीर बांधकामांवर तीव्र चिंता व्यक्त करताना गणेश बिडकर म्हणाले, "धरणक्षेत्रातील या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांमुळे धरणांची नैसर्गिक पाणीसाठा क्षमता तर घटत आहेच, शिवाय सांडपाणी थेट जलाशयात मिसळल्यामुळे पाण्याचा दर्जा खराब होत आहे. लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू असून धरणक्षेत्राचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे."

जलसंपदा विभागाने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, अतिक्रमणे चिन्हांकित करून ती लवकरात लवकर हटविण्याची कारवाई सुरू केल्याचा दावा बिडकर यांनी केला. पुणेकरांच्या घरोघरी शुद्ध आणि सुरक्षित पाणी पोहोचवायचे असेल, तर धरणक्षेत्राची स्वच्छता आणि संरक्षण करणे ही पहिली पायरी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कारवाईला विरोध का? – बिडकर यांचा सवाल
पालिकेत आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांवर निशाणा साधताना गणेश बिडकर यांनी गंभीर आरोप केले. सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप जलसंपदा विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून या अतिक्रमणांवर कारवाईसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु, महापालिका सभागृहात या कारवाईविरोधात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील काही बड्या नेत्यांचे स्वतःचे बंगले आणि रिसॉर्ट्स याच अतिक्रमित धरणक्षेत्रात असल्याच्या चर्चा नागरिक व राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

जर विरोधकांचा हेतू प्रामाणिक असेल आणि त्यांना खरोखरच पुणेकरांच्या पाण्याचा पुळका असेल, तर मग धरण क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होताच विरोधकांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? कारवाईला विरोध करणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत पुणेकरांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे, असा सवाल बिडकर यांनी केला.

पालकमंत्र्यांकडे संयुक्त कारवाईची मागणी करण्याचे आवाहन
राजकीय चिखलफेक करण्याऐवजी शहराच्या हिताला प्राधान्य देण्याचा सल्ला देत बिडकर यांनी विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि अमोल बालवडकर यांच्यावरही निशाणा साधला. "केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी किंवा स्टंटबाजी करण्यासाठी नागरिकांची दिशाभूल करणे थांबवले पाहिजे," असा इशारा त्यांनी दिला.

विरोधी नेत्यांना आवाहन करताना ते म्हणाले की, जर तुम्हाला खरोखरच शहराच्या पाणीप्रश्नाची काळजी असेल, तर तुम्ही पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची थेट भेट घेऊन धरणक्षेत्रातील सर्व बेकायदेशीर बंगले आणि रिसॉर्ट्सवर तातडीने बुलडोझर चालवण्याची लेखी मागणी करावी. विरोधकांनी अशी ठोस भूमिका घेतली, तर त्याचा थेट फायदा राजकीय पक्षांना नाही तर आम जनतेला आणि संपूर्ण पुणेकरांनाच होईल.

राजकीय वाद आणखी पेटण्याची चिन्हं
खडकवासला आणि पवना धरणक्षेत्र हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची जीवन वाहिनी मानले जाते. या भागातील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास आणि पाण्याचे प्रदूषण हा अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. एका बाजूला प्रशासन व सत्ताधारी भाजप या अतिक्रमणांवर हातोडा मारण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

गणेश बिडकर यांच्या या थेट आरोप सत्रामुळे येत्या दिवसांत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय कलगीतुरा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો