મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर आणि परिसरासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली खडकवासला धरणातून १८.३८ टीएमसी पाण्याचा विसर्ग
पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली खडकवासला धरणातून १८.३८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

Pune News : खडकवासला धरणातून १८.३८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर आणि परिसरासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. चालू पावसाळ्यात खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची संपूर्ण वर्षभराची पाण्याची गरज भागेल इतका मुबलक पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार मुख्य धरणांचा मिळून बनलेला 'खडकवासला प्रकल्प' सध्या ९९.९४ टक्के भरला आहे. चारही धरणांमध्ये मिळून तब्बल २९.१३ टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये २८.३९ टीएमसी (९७.४१ टक्के) साठा होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.७४ टीएमसी अधिक पाणी उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने आणि वरील तीन धरणांमधून पाण्याची आवक सुरूच असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत तसेच कालव्यात नियमित विसर्ग केला जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News


शहराची पाण्याची गरज किती?

शहराला वर्षभरासाठी साधारणपणे १८ दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाण्याची आवश्यकता असते. विशेष म्हणजे, धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आतापर्यंत सुमारे १८.३८ टीएमसी पाणी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडून द्यावे लागले आहे. म्हणजेच शहराच्या एका वर्षाच्या वापराइतके पाणी नदीतून वाहून गेले असून, तरीही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठी पूर्ण साठा शिल्लक आहे.जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरणातून शनिवारी ४,२०८ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. याशिवाय, शेतीसाठीच्या नवीन मुठा उजव्या कालव्यातून १,०५४ क्युसेक आणि पुणे महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ६२२ क्युसेक पाण्याचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. चालू हंगामात खडकवासला धरण परिसरात ७४६ मि.मी., पानशेत परिसरात २,२६१ मि.मी., आणि वरसगाव परिसरात २,११२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या सर्व धरणांमधून वीजनिर्मितीसाठी आणि सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या संपूर्ण धरणसाखळीत सर्वाधिक पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. टेमघर परिसरात या हंगामात तब्बल ३,११० मि.मी. पावसाची नोंद झाली असून हे धरण ९९.५५ टक्के (३.६९ टीएमसी) भरले आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पाण्याची आवक आजही सुरूच आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे पुणे महापालिकेला पुढील वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत पाणीकपातीचा कोणताही निर्णय घ्यावा लागणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच पुणेकरांना पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

શેર કરો