Pune News : कात्रज गावठाणात नवजात बालिकेला पोलिसांकडून जीवनदान
Pune News :पुणे: कात्रज गावठाण येथील एका मोकळ्या खोलीत सुमारे एक महिन्याच्या निष्पाप स्त्री जातीच्या नवजात बालकाला बेवारस स्थितीत सोडून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : उघड्यावर फेकून दिले एक महिन्याचे बाळ
Pune News :पुणे: कात्रज गावठाण येथील एका मोकळ्या खोलीत सुमारे एक महिन्याच्या निष्पाप स्त्री जातीच्या नवजात बालकाला बेवारस स्थितीत सोडून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:५० वाजेच्या सुमारास घडली. https://maharashtramirror.com/ Pune News
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मोहन आगवणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज गावठाणातील फाटे आळी येथे शंकर मंदिराजवळील शौचालयाच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या खोलीत एका अज्ञात महिलेने तिच्या पालकत्वात असलेल्या अवघ्या एक महिन्याच्या बालिकेला उघड्यावर टाकून दिले. https://maharashtramirror.com/ Pune News
बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नवजात बालिकेला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आपल्या जन्मदात्या निष्पाप बालिकेचा पूर्णपणे परित्याग करून तिचा जीव धोक्यात घालणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव पुढील तपास करत आहेत.
