મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : गुलटेकडीत एमडीसह तरुण जेरबंद; दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर: मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने गुलटेकडी परिसरात एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

गुलटेकडीत एमडीसह तरुण जेरबंद; दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात ;स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गुलटेकडीत एमडीसह तरुण जेरबंद; दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात ;स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : अंमली पदार्थ विरोधी पथकाची सापळा रचून कारवाई; ॲक्टिव्हा, मोबाईलसह २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर: मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाचा साठा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने गुलटेकडी परिसरात एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली. या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून एमडीसदृश अंमली पदार्थ, होंडा ॲक्टिव्हा आणि मोबाईल असा एकूण २ लाख २० हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.https://maharashtramirror.com/ pune crime,

यश राजू आरणे (वय १९, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन विधीसंघर्षित बालकांची ओळख कायदेशीर तरतुदींनुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ pune crime

गस्तीदरम्यान मिळाली माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेच्या विविध पथकांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि अंमलदारांचे पथक बुधवारी (९ सप्टेंबर) शहरात गस्त घालत होते.https://maharashtramirror.com/ pune crime

स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरात तीन जण मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. चित्रगंधा अपार्टमेंटच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हे तिघे येणार असल्याची माहिती होती.

पोलिसांचा सापळा; दोघे जागीच ताब्यात

माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चित्रगंधा अपार्टमेंट परिसरात सापळा रचला. संशयित त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यश आरणे आणि एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्यासोबत असलेला आणखी एक विधीसंघर्षित बालक तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ pune crime

पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटनुसार, आरोपींच्या ताब्यातून ५३.५२ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याशिवाय गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ आणि अन्य वस्तू मिळून एकूण २ लाख २० हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पळालेल्या बालकाचाही शोध

कारवाईदरम्यान पळून गेलेल्या विधीसंघर्षित बालकाचा पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान तो पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात एक प्रौढ आरोपी आणि दोन विधीसंघर्षित बालके पोलिसांच्या ताब्यात आली आहेत.

स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास केला जात आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त हसन गौहर आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक योगेश कोतकर तसेच विठ्ठल साळुंखे, राहुल मद्देल, अमोल सरडे, किरण जाधव, अमरनाथ लोणकर, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, संजय राजे, भिलारे, अविनाश रेडके, मंगेश गुंड, अक्षय शिर्के आणि महिला पोलिस अंमलदार आशा भिंगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

શેર કરો