Pune News : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; यंत्रणा सज्जपाच जिल्ह्यांत १,०५१ मतदान केंद्रे; ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार बजावणार हक्क
Pune News :पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होणार आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News :पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही मतदारसंघांत एकूण ७७ उमेदवार रिंगणात असून, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत १,०५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
पदवीधर मतदारसंघासाठी ४७ उमेदवार असून, ७४१ मतदान केंद्रांवर ३ लाख ८८ हजार १९ मतदार मतदान करतील. शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार असून, ३१० केंद्रांवर ६१ हजार ९४० मतदार मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे ७,५०० कर्मचारी तैनात असतील. मतदारांसाठी पिण्याचे पाणी, रॅम्प, वीज, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि मदत कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पाचही जिल्ह्यांत ३० भरारी पथके नियुक्त केली आहेत. मतदानानंतर मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
