મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीची बंडखोरी शमली; भैय्या माने, मंगेश चिवटे यांची माघार

Pune News :पुणे : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील बंडखोरी शमविण्यात भाजपला यश आले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीची बंडखोरी शमली; भैय्या माने, मंगेश चिवटे यांची माघार
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीची बंडखोरी शमली; भैय्या माने, मंगेश चिवटे यांची माघार

Pune News : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शिष्टाई यशस्वी; पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत

Pune News :पुणे : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील बंडखोरी शमविण्यात भाजपला यश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात ठाण मांडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी, तर पुणे शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी शुक्रवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे शरद लाड यांनीही डमी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, स्मिता जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर लाड यांनीही आपला अर्ज मागे घेतला.

दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत बंडखोरीचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चिवटे यांनीही माघार घेतल्याने महायुतीला दिलासा मिळाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याने महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट दूर झाले आहे.

भैय्या माने आणि मंगेश चिवटे यांच्या माघारीनंतर पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો