મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीला धक्का?

Pune News पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीला धक्का?
पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीला धक्का?

Pune News : भैय्या माने स्वतंत्र लढण्याच्या तयारीत; मुश्रीफांच्या मनधरणीचे प्रयत्नही निष्फळ?

Pune News पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, अमरावती शिक्षक, औरंगाबाद पदवीधर आणि नागपूर पदवीधर या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भैय्या माने यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, महायुतीतील जागावाटपाच्या समीकरणामुळे त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

भैय्या माने यांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी मतदार नोंदणीसह संघटनात्मक पातळीवर तयारीही सुरू केली होती. मात्र, पुणे पदवीधर तसेच पुणे शिक्षक या दोन्ही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आल्याने महायुतीमध्ये उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भैय्या माने यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या गोटात चर्चांना उधाण आले आहे. माने यांनी हसन मुश्रीफ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा असून, त्यामुळे कोल्हापूरसह पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, माने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी आपापले दावे पुढे केले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून, अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होण्याची शक्यता आहे.

भैय्या माने यांच्या संभाव्य स्वतंत्र उमेदवारीमुळे या निवडणुकीतील समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि माने आपली भूमिका कायम ठेवतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો