મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : दगडूशेठसह मानाच्या पाचही गणपतींना भावपूर्ण निरोप

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

दगडूशेठसह मानाच्या पाचही गणपतींना भावपूर्ण निरोप पांचाळेश्वर घाटावर रात्री ८.२५ वाजता दगडूशेठ गणपतीचे विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप
दगडूशेठसह मानाच्या पाचही गणपतींना भावपूर्ण निरोप पांचाळेश्वर घाटावर रात्री ८.२५ वाजता दगडूशेठ गणपतीचे विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप

Pune News : पांचाळेश्वर घाटावर रात्री ८.२५ वाजता दगडूशेठ गणपतीचे विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्य विसर्जन मार्गावरील बेलबाग चौकातून दुपारी चारच्या सुमारास पुढे निघालेली दगडूशेठ गणपतीची मिरवणूक शहराच्या मध्यवर्ती भागातून मार्गस्थ झाली. रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी मुठा नदीपात्रातील पांचाळेश्वर घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, अलका चौकासह मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशभक्तांची मोठी गर्दी होती. ढोल-ताशांचा निनाद आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामुळे संपूर्ण विसर्जन मार्ग भक्तिमय झाला होता.https://maharashtramirror.com/ Pune News

‘श्री वक्रतुंड’ रथातून दगडूशेठची मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आकर्षक नक्षीकाम आणि फुलांनी सजवलेल्या ‘श्री वक्रतुंड’ रथात विराजमान होती. मिरवणूक अलका चौकात पोहोचल्यानंतर भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. या रथाचे सारथ्य पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. त्यानंतर मिरवणूक पांचाळेश्वर घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली.https://maharashtramirror.com/ Pune News

मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन

दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनापूर्वी पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींना निरोप देण्यात आला. ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यांच्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढण्यात आल्या. पुण्याच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपतीपासून झाली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास मिरवणूक महात्मा फुले मंडई परिसरात दाखल झाली. सकाळी १०.२८ वाजता गणपती बेलबाग चौकात पोहोचला. सुमारे सहा तास ५५ मिनिटांच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी ४.४० वाजता कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरीला पाच वाजता निरोप

मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सकाळी ११.२५ वाजता मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली. तब्बल सव्वासात तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सायंकाळी पाच वाजता गणरायाचे विसर्जन करण्यात आले.मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती सकाळी १०.१५ वाजता मंडई परिसरातून मार्गस्थ झाला. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक पुढे सरकली. सुमारे सात तास २० मिनिटांच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी ५.०५ वाजता गणपतीचे विसर्जन झाले.

तुळशीबाग, केसरीवाडा गणपतीलाही निरोप

मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी १०.४५ वाजता सुरुवात झाली. दुपारी १.५४ वाजता गणपती बेलबाग चौकात दाखल झाला. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकत सायंकाळी ५.३४ वाजता श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुरू झाली. पारंपरिक लवाजमा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकात पोहोचली. सायंकाळी ६.१५ वाजता केसरीवाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जनानंतरही पुण्याच्या मध्यवर्ती भागातील उत्साह कायम होता. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी विसर्जन मार्गावर मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. अखेर रात्री ८.२५ वाजता पांचाळेश्वर घाटावर दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर हजारो भाविकांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો