Pune News : विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण
Pune News :पुणे: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न यंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
2 મિનિટ વાંચન

Pune News :सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड
Pune News :पुणे: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न यंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागातर्फे २५ आणि २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान विसर्जन मिरवणूक मार्गांवर नोंदवण्यात आलेल्या आवाजाच्या तीव्रतेच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आखून दिलेल्या सुरक्षेच्या नियमांची आणि मर्यादांची उघडपणे पायमल्ली झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सरासरी १०४.५ डेसिबलची नोंद; नियमावलीचा फज्जा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्व्यांनुसार निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल, तर व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराच्या प्रमुख चौक आणि मार्गांवर सरासरी १०४.५ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे, जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जाते.
विद्यापीठाच्या अहवालानुसार, विसर्जन मिरवणूक मार्गावरील प्रमुख १० चौकांमध्ये २४ तासांत निरनिराळ्या वेळी ध्वनी पातळी मोजण्यात आली. बेलबाग चौक येथे दुपारी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता अनुक्रमे ११२.५ आणि १११.९ डेसिबल इतकी तीव्र नोंद झाली. या चौकातील २४ तासांची सरासरी १०४.० डेसिबल होती. गोखले चौकात दुपारी ४ वाजता ११३.९ डेसिबल तर रात्री ८ वाजता सर्वाधिक ११५.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली. उंबऱ्या गणपती चौक येथे दुपारी ४ वाजता ११५.२ डेसिबलचा उच्चांक नोंदवला गेला. शेडगे विठोबा आणि होळकर चौक या भागांमध्ये अनुक्रमे १०६.३ आणि १०६.८ डेसिबल इतकी सर्वोच्च सरासरी नोंदवली गेली.
मध्यरात्रीही डीजे व वाद्यवृंदाचा दणदणाट
नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत शांतता राखणे आवश्यक असताना, २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री (१२:०० AM) सर्वच चौकांमध्ये सरासरी ११२.६ डेसिबल ध्वनीची नोंद झाली. मध्यरात्री १२ वाजता कुंटे चौक (११३.९ dB), उम्र्या गणपती (११३.८ dB) आणि शेडगे चौक (११३.७ dB) येथे आवाजाची मर्यादा अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचली होती. पहाटे ४:०० वाजता देखील शहराच्या बहुतेक चौकांत सरासरी १०५.१ डेसिबल आवाज नोंदवला गेला, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणामांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा पाहणी अहवाल सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयक मेहेर आणि आयुष यांनी तयार केला आहे.
सुरक्षित मर्यादेपेक्षा दुपटीने अधिक असलेल्या या आवाजामुळे बहिरेपणा, तीव्र मानसोपचार समस्या, आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवातील सांस्कृतिक परंपरा आणि उत्साह जपत असतानाच, उच्च क्षमतेचे साउंड सिस्टीम (डीजे) व मिरवणुकीतील अवाढव्य वाद्यवृंदांवर कडक नियंत्रणाची गरज असल्याचे या अहवालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिक व प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे काळाची गरज बनली आहे.
