Pune News : विसर्जन मिरवणुकीत वैद्यकीय मदतीसाठी विशेष पथक
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे गणेशभक्त, पोलीस कर्मचारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शहर पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टने विशेष वैद्यकीय मदत पथकाची तयारी केली आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : विघ्नहर्ता ट्रस्टचा पुढाकार; डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवकांसह सुसज्ज रुग्णवाहिका राहणार तैनात
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे गणेशभक्त, पोलीस कर्मचारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शहर पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टने विशेष वैद्यकीय मदत पथकाची तयारी केली आहे. मिरवणुकीदरम्यान गरज भासल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त मध्यवर्ती भागात दाखल होतात. गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही दीर्घकाळ रस्त्यावर कार्यरत असतात. या पार्श्वभूमीवर अचानक प्रकृती बिघडणे किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्टने ही व्यवस्था केली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
वैद्यकीय मदत पथकात तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय स्वयंसेवक, परिचारिका, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकांचा समावेश असेल. याशिवाय आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिकाही उपलब्ध राहणार आहेत. आपत्कालीन प्रसंगी प्राथमिक उपचार देण्याबरोबरच गरजेनुसार रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत घेतली जाणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत हे वैद्यकीय मदत पथक अहोरात्र कार्यरत राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा मिरवणूक मार्गावर वैद्यकीय मदतीची आवश्यकता निर्माण झाल्यास कमीत कमी वेळेत मदत उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते आणि बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक मदत देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक वैद्यकीय तसेच अन्य स्वयंसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी डॉ. शंतनू जगदाळे (९०११९१६६०७), डॉ. नंदकुमार बोरसे (९४२२०३२६९६), नचिकेत दांडेकर (९९२१४९८३०९) किंवा सदाशिव कुंदेन (९९२१५७४४९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे विघ्नहर्ता ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.
