મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतुकीत मोठे बदल

Pune News : पुणे: शुक्रवारी (२५ सप्टेंबर) निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतुकीत मोठे बदल २४ मुख्य रस्ते बंद, शहरात २६ ठिकाणी पार्किंगची सोय
विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतुकीत मोठे बदल २४ मुख्य रस्ते बंद, शहरात २६ ठिकाणी पार्किंगची सोय

Pune News : २४ मुख्य रस्ते बंद, शहरात २६ ठिकाणी पार्किंगची सोय

Pune News : पुणे: शुक्रवारी (२५ सप्टेंबर) निघणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी २४ महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले असून मुख्य शहरात २६ ठिकाणी वाहनांसाठी अधिकृत पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. पुणे शहराचे पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

रस्ते बंद आणि पर्यायी मार्ग ('रिंग रोड')


२५ सप्टेंबर रोजी पहाटे ५:०० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत शिवाजी रोड (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक) आणि लक्ष्मी रोड (संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील.https://maharashtramirror.com/ Pune News

याशिवाय बाजीराव रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड आणि कर्वे रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर सकाळी ९:०० ते १२:०० च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी 'रिंग रोड' निश्चित केला आहे. यात कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, सिमला ऑफिस चौक, मालधक्का, नेहरू रोड, सातारा रोड, सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता या मार्गांचा वापर नागरिक करू शकतात.

२५ सप्टेंबरपासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत या रिंग रोडवर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी शहरात सलग ४८ तास सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. धायरी फाटा, केशवनगर-मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरातील वाहतुकीतही आवश्यकतेनुसार एकेरी मार्ग व पर्यायी वळणे देण्यात आली आहेत.

नो-पार्किंग आणि २५ हून अधिक ठिकाणी पार्किंग सोय


मुख्य मिरवणूक मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव २४ सप्टेंबरच्या रात्री ११:०० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत 'नो-पार्किंग' झोन जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड व आसपासच्या १०० मीटर परिसरात पार्किंगला बंदी असणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २६ ठिकाणी विनामूल्य व अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग व टिळक रोड), एस. पी. कॉलेज, गरवारे कॉलेज, एफ. सी. कॉलेज, बीएमसीसी कॉलेज मैदान, निलायम टॉकीज, पेशवे पार्क (सारसबाग), पाटील प्लाझा आणि नदीपात्र (भिडे पूल ते गाडगीळ पूल) या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો