મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 'पुणे फेस्टिव्हल'च्या ३८ व्या पर्वाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 'पुणे फेस्टिव्हल'च्या ३८ व्या पर्वाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

Pune News : 'पुणे फेस्टिव्हल'च्या ३८ व्या पर्वाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ; मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.https://maharashtramirror.com/ Pune News

श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पुणे फेस्टिव्हलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मीरा सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते. https://maharashtramirror.com/ Pune News

यावेळी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुण्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करतांना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हलने कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला एकत्र आणत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध देशांतील कलाकार, पर्यटक, प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते. यंदाच्या महोत्सवात २१ देशांतील विद्यार्थी सहभागी झाले हे विविध श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचा आदर ही भारताच्या सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

पुणे फेस्टिव्हलच्या सातत्यपूर्ण आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या योगदानाचेही स्मरण केले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा उत्सव’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली असून हा उत्सव साजरा करतांना पुणे फेस्टिव्हल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करीत आहे. पर्यटन हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे फेस्टिव्हलला भविष्यात आणखी विस्तार देऊन जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा समर्पण अभियानांतर्गत’ महोत्सवाच्या काळात विविध सेवाभावी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे फेस्टिव्हलच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, नाट्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना या महोत्सवाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या कलाकारांसोबत नवोदित कलाकारांना संधी देणे, महिला महोत्सव, लावणी महोत्सव, चित्रकला, नृत्य, पाककला, मेहंदी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग हे पुणे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाला शुभेच्छा देताना श्री. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय आणि देश-विदेशात त्याचे आयोजन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षमतांचा विस्तार आहे. ‘वारसा ते विकास’ या संकल्पनेतून वारसा, परंपरा आणि विकास यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. पुणे फेस्टिव्हल हे महाराष्ट्राची आणि देशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही श्री. शेलार यांनी नमूद केले. पुणे फेस्टिवलच्या चेअरमन मीरा कलमाडी यांनी आपल्या प्रास्ताविकात पुणे फेस्टिवलच्या ३८ वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો