મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणे विभागात ६.५८ लाखांचा अन्नसाठा जप्त; फुटाणे डाळ, बदाम, काळ्या बेदाण्यांचा समावेश

Pune News : पुणे : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी कारवाई केली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणे विभागात ६.५८ लाखांचा अन्नसाठा जप्त; फुटाणे डाळ, बदाम, काळ्या बेदाण्यांचा समावेश
पुणे विभागात ६.५८ लाखांचा अन्नसाठा जप्त; फुटाणे डाळ, बदाम, काळ्या बेदाण्यांचा समावेश

Pune News : पुणे : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी कारवाई केली. या कारवाईत फुटाणे डाळ, बदाम आणि काळे बेदाणे असा एकूण १ हजार ३२९ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे ६ लाख ५८ हजार २७५ रुपये आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी विभागातील विविध आस्थापनांमध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी लेबलवरील माहितीमध्ये त्रुटी तसेच निर्धारित गुणवत्ता मानकांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्याने संबंधित साठ्यांवर कारवाई करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

फुटाणे डाळ, बदाम आणि बेदाणे जप्त

या कारवाईत मे. रिकी ट्रेडर्स येथून ४७८ किलो फुटाणे डाळ जप्त करण्यात आली. या मालाची किंमत ५३ हजार ७७५ रुपये आहे. मे. एस. एस. सेल्स कॉर्पोरेशन येथून ३५८ किलो बदामाचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ३ लाख ५८ हजार रुपये आहे. तसेच, मे. निर्मल कोल्ड स्टोरेज येथून ४९३ किलो काळे बेदाणे जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत २ लाख ४६ हजार ५०० रुपये आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय


संबंधित अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आणि गुणवत्ता मानकांचे पालन न झाल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साठ्याबाबत अन्नसुरक्षा नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. अन्नपदार्थांची विक्री करताना आवश्यक गुणवत्ता मानके, योग्य लेबलिंग आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો