મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : अवैध मद्यनिर्मिती, तस्करीविरोधात उत्पादन शुल्क विभागाचा धडाका ; तीन महिन्यांत १,५५४ गुन्हे दाखल; १,९६० आरोपींना अटक, ८.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे विभागात धडक मोहीम राबविली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

अवैध मद्यनिर्मिती, तस्करीविरोधात उत्पादन शुल्क विभागाचा धडाका ; तीन महिन्यांत १,५५४ गुन्हे दाखल; १,९६० आरोपींना अटक, ८.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त
अवैध मद्यनिर्मिती, तस्करीविरोधात उत्पादन शुल्क विभागाचा धडाका ; तीन महिन्यांत १,५५४ गुन्हे दाखल; १,९६० आरोपींना अटक, ८.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे विभागात धडक मोहीम राबविली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विभागाने १ हजार ५५४ गुन्हे दाखल करून १ हजार ९६० आरोपींना अटक केली. या कारवाईत ८ कोटी ३३ लाख २८ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट दारू, परराज्यांतून होणारी मद्यतस्करी आणि अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

परराज्यांतून होणाऱ्या मद्यतस्करीवरही कारवाई


गोवा, हरियाणा आणि अन्य राज्यांतून महाराष्ट्रात अवैधरीत्या आणल्या जाणाऱ्या मद्याविरोधात विभागाने विशेष कारवाई केली. सैन्याच्या राखीव मद्यसाठ्यातून अवैधरीत्या आणल्या जाणाऱ्या मद्याचाही यात समावेश आहे. या प्रकरणांत १२ गुन्हे दाखल करून १८ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ११ वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३३ लाख ९० हजार ९० रुपये आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी २४१ प्रस्ताव


अवैध मद्यव्यवसायांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यासाठी २४१ प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यापैकी ७२ प्रकरणांत बंधपत्राची कार्यवाही करण्यात आली असून, ७१ लाख ५० हजार रुपयांची बंधपत्र रक्कम नमूद करण्यात आली आहे.

गांधी सप्ताहात नऊ पथकांकडून कारवाई


अवैध मद्यव्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी १ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतही विशेष मोहीम राबविण्यात आली. गांधी सप्ताहानिमित्त नऊ पथकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत २६३ गुन्हे दाखल करून २९४ आरोपींना अटक करण्यात आली. या मोहिमेत २० वाहने जप्त करण्यात आली असून, ३३ लाख ८० हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हातभट्टी दारू आणि सार्वजनिक मद्यपानावर कारवाई


अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याच्या प्रकारांविरोधातही विभागाने कारवाई केली. या संदर्भात १७२ गुन्हे दाखल करून ४१३ आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयीन कारवाईतून एकूण ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाई यापुढेही सुरू राहणार


“राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात कारवाई सुरू आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांना अवैध मद्यविक्री किंवा मद्याच्या बेकायदा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी विभागाला कळवावे,” असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे-१ चे अधीक्षक अतुल कानडे यांनी केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો