મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : पुणेकरांची दिवाळी होणार गोड; लाडू-चिवडा २३० रुपये किलो

Pune News :पुणे : दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे यंदाही लाडू-चिवडा विक्री उपक्रम राबविण्यात येणार आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुणेकरांची दिवाळी होणार गोड; लाडू-चिवडा २३० रुपये किलो
पुणेकरांची दिवाळी होणार गोड; लाडू-चिवडा २३० रुपये किलो

Pune News :पुणे : दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे यंदाही लाडू-चिवडा विक्री उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे ३९ वे वर्ष असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २० केंद्रांवर लाडू-चिवड्याची विक्री केली जाणार आहे. लाडू आणि चिवड्याचा दर प्रतिकिलो २३० रुपये, तर अर्धा किलोसाठी १२० रुपये निश्चित करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गंगाधामजवळील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजूश्री सभागृहात राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा विविध सामाजिक संस्थांसह सीमेवरील जवानांपर्यंतही फराळ पोहोचविण्यात येणार आहे. ग्राहकांना सहजपणे फराळ खरेदी करता यावा, यासाठी शहराच्या विविध भागांत विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. लाडू-चिवडा एक किलो आणि अर्धा किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल.

अन्नसुरक्षा कायद्यातील नियमांचे पालन करून पदार्थांची गुणवत्ता, पोषणमूल्ये आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी दखल घेतली आहे. तसेच चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षात इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्याची नोंद झाली आहे.

पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी आणि परदेशात फराळ पाठविण्यासाठी टपाल विभाग विशेष सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी मार्केट यार्डातील चेंबरच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या ३८ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही उद्घाटन सोहळ्यात होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો