મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : पुण्यात डीजे विरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे : लाऊड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड लावणाऱ्या बिबवेवाडी ओटा येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पुण्यात डीजे विरोधात गुन्हा दाखल
पुण्यात डीजे विरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे : लाऊड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड लावणाऱ्या बिबवेवाडी ओटा येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोबतच साऊंड सिस्टिम देखील जप्त करण्यात आले आहेत. राहुल प्रकाश जगताप असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. या वर्षीच्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेलं हे पहिलेच मंडळ असल्याची माहिती आहे. श्रीकृष्ण मंडळाने 8 बेस व 8 टॉप असे लाऊड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे. परिणामी, पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत साऊंड सिस्टिम देखील जप्त केलं आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

શેર કરો