મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : सायबर भामट्यांनी लांबवले १८.८५ लाख

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक गडद होत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल १८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

सायबर भामट्यांनी लांबवले १८.८५ लाख ऑनलाईन कर्जाचे आमिष अन् निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक
सायबर भामट्यांनी लांबवले १८.८५ लाख ऑनलाईन कर्जाचे आमिष अन् निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक

Pune Crime : ऑनलाईन कर्जाचे आमिष अन् निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक गडद होत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल १८ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एका प्रकरणात कर्ज व अनुदानाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात चक्क निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाच्या बँक खात्यातून १० लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

कर्ज अन् अनुदानाच्या बहाण्याने ८.८५ लाखांचा गंडा
फसवणुकीची पहिली घटना लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. खडकी येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर भामट्याने ऑनलाईन माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. संशयित आरोपीने तक्रारदारास सुलभ कर्ज आणि सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
त्यानंतर भामट्याने तरुणाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याच्या नकळत त्याच्या नावे कर्ज मंजूर करून घेतले. ही कर्जाची रक्कम तक्रारदाराला न देता आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतली आणि तरुणाची ८ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी लक्ष्मी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, कलम ३१८(४), ३१९(२) आणि आयटी ॲक्ट ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगताप या गुन्ह्याचा तपास करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune Crime

८२ वर्षीय वृद्धाला निवडणूक आयोगाच्या नावाने १० लाखांचा फटका

दुसऱ्या घटनेत, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन सायबर फ्रॉडचा सामना करावा लागला. १० ऑगस्ट २०२६ रोजी सायबर गुन्हेगाराने वृद्धाला फोन करून स्वतः ‘निवडणूक आयोगातून’ बोलत असल्याचे भासवले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
संशयिताने विविध कायदेशीर प्रक्रियांचे कारण सांगून वृद्धाकडून त्यांच्या सर्व बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवली आणि तिच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून १० लाख रुपये परस्पर लांबवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित वृद्धाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम ३१८(४), ३१९(२) आणि आयटी ॲक्ट ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डाबेराव तपास करत आहेत.

શેર કરો