મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : बनावट खात्यांद्वारे १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बनावट बँक खात्यांचा वापर करून देशभरातील १९ नागरिकांची एकूण १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

बनावट खात्यांद्वारे १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक
बनावट खात्यांद्वारे १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

Pune Crime : वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल; बँक खाते इतरांना वापरू न देण्याचे पोलिसांचे आवाहन

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बनावट बँक खात्यांचा वापर करून देशभरातील १९ नागरिकांची एकूण १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्याकडून फसवणुकीच्या तक्रारींशी संबंधित पैशांचा मागोवा, बनावट बँक खाती तसेच धनादेश आणि एटीएमद्वारे रक्कम काढल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ) श्रवण राजेंद्र अंकूशे (वय 25, रा. देवाची उंड्री, पुणे, हरीओम हरीराम साहू (वय 24, रा. सिध्दार्थनगर, एमआयबीएम रोड, पुणे), सौद इदफान शेख (वय 23, रा.येरवडा, पुणे), साहील रौफ शेख (वय 25, रा. येरवडा, पुणे) आणि तालीब नूरमोहम्मद शेख (वय 25, येरवडा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नवे आहेत. https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या नावावरील केवायसी कागदपत्रांच्या आधारे बनावट खाती सुरू केली होती. या खात्यांवर एकूण ६ लाख ९ हजार ७३० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले. संबंधित ऑनलाइन फसवणूक प्रकरणांमध्ये देशभरातील १९ नागरिकांची एकूण १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलिस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड, पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलिस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले आणि तपास पथकाने ही कारवाई केली. आमिषाला बळी पडून स्वतःच्या नावावर सुरू केलेले बँक खाते कोणत्याही अन्य व्यक्तीला वापरण्यास देऊ नये, असे आवाहन वानवडी पोलिसांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો