મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime News : ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद

पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News : वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने जेरबंद केले.

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

Pune Crime News : ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई; १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला : Pune Crime News


पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News : वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने जेरबंद केले. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. चोरीचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपावरून आणखी एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे. Maharashtra mirror news

Pune Crime News : ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट-५कडे सोपविण्यात आला होता. Maharashtra mirror news

तपासादरम्यान पथकाने घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींची माहिती गोळा केली. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे बोगद्याजवळील सुरक्षानगर, हडपसर परिसरात सापळा रचून हादीहसन सर्फराज इराणी (वय २५, रा. शिवाजीनगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. Maharashtra mirror news

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या गुन्ह्यातील चोरीचे दागिने त्याने ओळखीतील जुनैद इस्माईल कुरेशी (वय २३, रा. कॅम्प, पुणे) याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर कुरेशी याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर दुचाकीसह पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Maharashtra mirror news

Pune Crime News : ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारा जेरबंद

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच युनिट-५च्या पथकाने ही कारवाई केली. Maharashtra mirror news google

શેર કરો