મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : ‘मनी लॉन्ड्रिंग केस’मध्ये अडकविण्याची धमकी

Pune Crime :८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ४५.२० लाखांची फसवणूक

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

‘मनी लॉन्ड्रिंग केस’मध्ये अडकविण्याची धमकी
८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ४५.२० लाखांची फसवणूक

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : पोलीस असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि अटक करण्याची धमकी देत सायबर भामट्यांनी कोथरूडमधील एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. २० ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला.

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१९(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला मोबाईलवर संपर्क साधला. आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावणी केली. या प्रकरणात अटक होऊ शकते, अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांच्यावर दबाव निर्माण केला.

आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण ४५ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले. अशा प्रकारे आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केली.

मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि खाते वापरणाऱ्यांचा शोध सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कारोटे करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper