મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या; मुलावरही चाकूने हल्ला

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : खेड तालुक्यातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन इमारतीत एका पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या; मुलावरही चाकूने हल्ला कौटुंबिक कलहातून घडली घटना
पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या; मुलावरही चाकूने हल्ला कौटुंबिक कलहातून घडली घटना

Pune Crime : कौटुंबिक कलहातून घडली घटना

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : खेड तालुक्यातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन इमारतीत एका पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आपल्या बहिणीशी बोलत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात आईला वाचवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलावरही पतीने चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. https://maharashtramirror.com/ Pune Crime

बहिणीशी बोलत नाही म्हणून उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, खेड येथील वाडा रोडवरील संगम गार्डनमधील ‘जी-२’ विंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ५५) याचे आपली पत्नी सौ. दिपा महेंद्र दौंडकर (वय ५०) हिच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेनऊ ते सव्वा अकराच्या सुमारास, दिपा या आपल्या बहिणीशी बोलत का नाहीत, या रागातून महेंद्र याने तिचा गळा आवळून जागीच खून केला.https://maharashtramirror.com/Pune Crime

आईला वाचवायला गेलेल्या मुलावर चाकूने वार
त्याच वेळी १७ वर्षांचा मुलगा अथर्व हा बेडरूममध्ये आईला उठवण्यासाठी गेला असता, त्याने आईला निपचित पडलेले पाहिले. त्यानंतर आरोपी महेंद्र याने अथर्व याच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळून त्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. अथर्वने आरडाओरडा करत घरातून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने "तुला चाकूने खुपसून मारून टाकेन" अशी धमकी दिली आणि त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.https://maharashtramirror.com/Pune Crime

याप्रकरणी जखमी मुलगा अथर्व महेंद्र दौंडकर (वय १७, रा. वाडा रोड, खेड) याने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात आरोपी पिता महेंद्र शिवाजी दौंडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

શેર કરો