Pune News : चार वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : उत्तमनगर पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली.
1 મિનિટ વાંચન

Pune News :उत्तमनगर पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : उत्तमनगर पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली. विशाल लक्ष्मण चव्हाण (वय २०, रा. शिवणे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमित बोबरे आणि तुषार किल्ले यांना गोपनीय बातमीदाराकडून विशाल सणवाण याच्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर कारवाईचे आदेश मिळाल्याने पथकाने आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Pune News
आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी केली असता त्याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेची कलमे ३२३, ५०४, ५०६(२), शस्त्र अधिनियमाचे कलम ४(२५), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) तसेच अन्य नमूद कलमांनुसार गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस अंमलदार साठे, अमित बोडरे, तुषार किंद्रे आणि आशिष राठोड यांच्या पथकाने केली आहे.
