Pune Crime : भोरमध्ये दरोड्याच्या तयारीत पाच सराईत गुन्हेगारांना अटक; कोयता, कटावणीसह साहित्य जप्त
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना भोर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली.
1 મિનિટ વાંચન

कोयता, कटावणीसह साहित्य जप्त https://maharashtramirror.com/
Pune crime भोर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना भोर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. बसस्थानकाजवळ नाकाबंदी सुरू असताना विनानंबर प्लेटची संशयित कार पोलिसांनी अडवली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये कोयता, कटावणी, मिरची पूड, दोरी आणि बॅटरी असे संशयास्पद साहित्य आढळून आले. Pune crime

पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्यावर यापूर्वी खून, दरोडा, घरफोडी आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रदीप काळे, शरद काळे, मोहन मांडगे, सदानंद जवक आणि प्रशांत मांडगे (सर्व रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. Pune crime
भोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयितांची कार नाकाबंदीदरम्यान अडवण्यात आली आणि संभाव्य दरोड्याचा कट उधळून लावण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपी नेमका कोणत्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपशील काय आहे, याचा भोर पोलीस तपास करीत आहेत.
