મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : हांडेवाडीत बंद घराचे कुलूप चावीने उघडून चोरी

Pune Crime : २.२१ लाखांचा ऐवज लंपास

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

हांडेवाडीत बंद घराचे कुलूप चावीने उघडून चोरी
२.२१ लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime :हांडेवाडी, महाराष्ट्र मिरर : हांडेवाडी परिसरातील मनस्वी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्याने घराबाहेर बुटात ठेवलेली चावी वापरून घराचा दरवाजा उघडला आणि कपाटातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २१ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला हांडेवाडी येथील विश्वविनायकनगर परिसरातील डी मार्टच्या मागे असलेल्या मनस्वी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०१ येथे राहतात. त्यांच्या घराची चावी घराबाहेर बुटात ठेवण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने ही चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाच्या लॉकरमधील ६५ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २१ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून त्याला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस अंमलदार पाटोळे करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper