મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : ज्वेलर्स दुकानातून ४२.९२ लाखांच्या सोन्याच्या लगडी चोरीला

Pune Crime :फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

ज्वेलर्स दुकानातून ४२.९२ लाखांच्या सोन्याच्या लगडी चोरीला
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : ज्वेलर्स दुकानात सोने कारागीर म्हणून काम करणाऱ्या चार जणांनी मालकाची नजर चुकवून दुकानातील ४२ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या लगडी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ९३१ रविवार पेठ येथील ज्वेलर्स दुकानात ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी मंगळवार पेठ येथील ४७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चारही आरोपी फिर्यादी यांच्या ज्वेलर्स दुकानात सोने कारागीर म्हणून काम करीत होते. ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी फिर्यादी यांची नजर चुकवून दुकानातील सोन्याच्या लगडी चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या सोन्याची एकूण किंमत ४२ लाख ९२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लाला लोणकर करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper