Pune : मनपाच्या अंगणातच झाडांची घुसमट; वृक्षप्रेमींनी स्वतःहून काढले डांबर आणि काँक्रिट
Pune :शहरातील वाढत्या वृक्षपडीला झाडांभोवती केलेले डांबरीकरण आणि काँक्रिटिकरण हेच मुख्य कारण असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune : वृक्ष प्राधिकरणाचे 'अपुऱ्या मनुष्यबळा'चे कारण ठरले पोकळ; नागरिकांनीच हाती घेतला झाडांच्या संवर्धनाचा विडा
Pune :शहरातील वाढत्या वृक्षपडीला झाडांभोवती केलेले डांबरीकरण आणि काँक्रिटिकरण हेच मुख्य कारण असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने झाडांभोवती १ मीटर जागा मोकळी ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही, पुणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण "अपुऱ्या मनुष्यबळा"चे कारण देऊन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. याउलट, महापौरांनी वृक्षपडीसाठी चक्क पर्यावरणप्रेमींनाच जबाबदार धरल्याने संताप व्यक्त केला जात आहे. pune citizens remove concrete around trees pmc
PMC Tender Scam : अवास्तव दराच्या निविदांनी पुणेकरांच्या पैशांची लूट
या कारभाराचा निषेध म्हणून आज 'नागरिकांच्या वृक्ष संवर्धन समिती'चे रुपेश केसेकर, किशोर सुतार आणि सचिन भोसले यांनी पुढाकार घेत, पुणे मनपा मुख्य कार्यालयाच्या आवारातील झाडांच्या बुंध्याभोवती साचलेले डांबर आणि काँक्रिट स्वतःच्या हाताने काढून झाडांना 'मोकळा श्वास' मिळवून दिला.

गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही कारवाई शून्य
याबाबत अधिक माहिती देताना वृक्षप्रेमी रुपेश केसेकर म्हणाले की, "आम्ही हा प्रश्न गेल्या ३ वर्षांपासून संबंधित पथ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आहोत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. वृक्ष प्राधिकरणाचे मुख्य कामच झाडांचे संवर्धन करणे आहे, तरीही ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत."

महापालिका प्रशासनावर टीका करताना केसेकर यांनी "शहरात काम करण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दिले जाते, पण महापालिकेच्या मुख्यालयातही झाडांची काळजी घ्यायला कर्मचारी नाहीत का? असा संतापजनक सवाल उपस्थित करत जर वृक्ष प्राधिकरणाला ही कामे करणे शक्य नसेल, तर त्यांनी तसे जाहीरपणे मान्य करावे. प्रशासनाने हात टेकले असतील, तर आम्ही नागरिकांच्या सहभागातून ही जबाबदारी पेलू असे जाहिर वक्तव्यदेखील त्यांनी केले आहे.

एकीकडे शहरात पावसाळ्यात झाडपडीच्या घटना वाढत असताना आणि दुसरीकडे महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसत असताना, नागरिकांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका प्रशासनाला आरसा दाखवणारी ठरली आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
